तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा, स्थलांतरित कामगार आणि सूक्ष्म उद्योजकांच्या संरक्षणाला गती.
पणजी, ऑक्टोबर २०२५: गोव्यात वाढत्या वाहतूक अपघातांच्या पार्श्वभूमीवर, विमा क्षेत्रात नवनवीन आणि सुलभ उपाययोजना आणणाऱ्या झुनो जनरल इन्शुरन्स या डिजिटल विमा कंपनीने भारतातील पहिले गेमिफाइड रोड सेफ्टी अॅप लाँच केले आहे. हे अॅप गोवा राज्यस्तरीय विमा समितीच्या बैठकीत सादर करण्यात आले.
या अभिनव अॅपद्वारे वाहनचालकांना सुरक्षित आणि जबाबदार ड्रायव्हिंगसाठी प्रोत्साहित केले जाईल. टेलिमॅटिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तम ड्रायव्हिंग सवयींचे मूल्यांकन करून वापरकर्त्यांना गुण दिले जातील, त्यानुसार लीडरबोर्डवर रँकिंग करण्यात येईल. या माध्यमातून रस्ता सुरक्षा अधिक आकर्षक, सहभागी आणि मनोरंजक अनुभव बनविण्याचा झुनोचा उद्देश आहे.
झुनो जनरल इन्शुरन्सने गोव्यातील रस्ता सुरक्षा उपक्रमात उल्लेखनीय योगदान दिले आहे. गोवा वाहतूक विभागासोबतच्या भागीदारीतून कंपनीने विमारहित वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी करण्यात यश मिळवले आहे. मे २०२४ मधील ५.८३ लाखांवरून मे २०२५ मध्ये ती ५.६६ लाखांपर्यंत घटली असून, ही तब्बल ७.६ टक्क्यांची घसरण आहे.











