आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती
लांजा (प्रतिनिधी): सांगरुळ शिक्षण संस्था संचलित तालुक्यातील व्हेळ येथील रुक्मिणी भास्कर विद्यालयाचा रौप्य महोत्सवी सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
या सोहळ्यासाठी संस्थेचे सचिव आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर, राजापूर -लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यशवंतराव ल. खाडे (काका) यांनी भूषवले. याशिवाय या कार्यक्रमाला श्रीम. आसावरी देसाई, विवेक सावंत, माध्य. शिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे, संस्थेचे खजानणीस डी. जी. खाडे, ज्येष्ठ संचालक बी. आर. नाळे, गणपती बापू नाळे, सौ. अनु आसगावकर , लांजा पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, लांजा नगराध्यक्ष सौ. सावली कुरूप,
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य या सर्वांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या आजवरच्या शैक्षणिक कामकाजाबाबत गौरवोद्गार काढले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स. ब. खाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य आर. ए. कुंभार, माजी मुख्याध्यापक राजेंद्रकुमार गोंधळी, सांगरूळ शिक्षण संस्थेच्या विविध शाखांचे शाखाप्रमुख संजय डी.पाटील, एस. एम. नाळे, बी. एस.रामाणे तसेच बी. एन. माळवी, पी. एम. पाटील ,प्रा. नितीन पोतदार, प्रा. गुळवणी तसेच, तानाजी पाटील, शिवाजी पाटील बाबासाहेब खाडे , अशोक खाडे ,शंकर पाटील, जनार्धन मोरबाळे, सुरज आळवेकर, प्रल्हाद यादव, आणि इतरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शाळेला शुभेच्छा व प्रोत्साहन दिले.
यावेळी प्राचार्य संजय पाटील यांनी श्रीराम हायस्कुल च्या वतीने पाच हजार रुपये जाहिरात निधी देवून आर्थिक सहकार्य केल्याबद्दल रुक्मिणी भास्कर विद्यालय व्हेळ प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.













