कोकण रेल्वेकडून अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा

रत्नागिरी : उन्हाळी हंगाम २०२६ दरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेकडून अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्या मडगाव – पनवेल – मडगाव मार्गावर धावणार आहेत.

 

गाडी क्रमांक ०११०६ मडगाव – पनवेल साप्ताहिक विशेष ही गाडी २४ मे २०२६ आणि ३१ मे २०२६ रोजी (रविवार) मडगाव जंक्शन येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटेल. पुढील दिवशी पहाटे ४ वाजता पनवेल येथे पोहोचेल.

 

गाडी क्रमांक ०११०५ पनवेल – मडगाव साप्ताहिक विशेष ही गाडी २५ मे २०२६ आणि १ जून २०२६ रोजी (सोमवार) पनवेल येथून पहाटे ५.४५ वाजता सुटेल. त्याच दिवशी सायंकाळी ६.१० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

 

या गाड्यांना करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेन या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

 

गाड्यांची रचना पुढीलप्रमाणे असेल :

 

३ टियर एसी : ३ डबे

 

स्लीपर : ११ डबे

 

जनरल : ७ डबे

 

एसएलआर/डी : २ डबे

 

 

प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.