राजापूर | प्रतिनिधी : शहरानजीकच्या कोदवली साईनगर पुनर्वसन वसाहत येथील रहिवाशी व भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते तेजस शरद करंबेळकर (३२) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. तेजस त्याच्या आकस्मिक निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
तेजस याची प्रकृती बरी नसल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी त्याची प्राणज्योत मालावली.
तेजस हा भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता होता, पक्षाच्या विविध उपक्रमात व पक्ष कार्यात त्याचा कायम सहभाग असे. अत्यंत शांत संयमी व मितभाषी असा त्याचा स्वभाव होता. मुथुट फायनान्स कंपनी मध्ये सध्या तो नोकरी करत होता.
तेजस हा घरातील एकुलता एक कमवणारा मुलगा होता. त्याच्या अशा आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयावर डोंगर कोसळला असुन कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्याच्या पश्चात आई , वडील, एक बहीण काका, काकी व चुलत भाऊ असा परिवार आहे.












