सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल!

सिंधुदुर्ग वैश्य समाज पतसंस्थेचा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरव

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा सरकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे आंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पतसंस्थांच्या अधिवेशनात सहकार चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेचा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

या प्रसंगी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर, संचालक उमेश वाळके, सुनील डुबळे, गणपत पारकर, समीर वंजारी आदी उपस्थित होते.

आमदार केसरकर यांच्या हस्ते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना गौरवपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
अधिवेशनाला जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार चळवळीच्या बळकटीसाठी अशा संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.