रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील नेवरे-काजिरभाटी खाडीकिनारी मासेमारीसाठी गेलेल्या प्रौढाचा खाडीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवार 25 मे रोजी सकाळी 10.30 वा.सुमारास उघडकीस आली. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूच नोंद करण्यात आली आहे.
संजय अनंत गावडे (54,रा.ढोकमळे नेवरे,रत्नागिरी) असे खाडीत बूडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. संजय गावडे हे रविवार 24 मे रोजी दुपारी 3 वा.सुमारस काजिरभाटी खाडीत मासेमारी करण्यासाठी गेले होते. ते रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. दरम्यान सोमवारी सकाळी 10.30 वा.सुमारास संजय गावडे हे खाडीकिनारी निपचित स्थितीत त्यांच्या नातेवाईकांना मिळून आले. त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.ं










