पहाटे रस्त्यावर सापडलेले ते बालक अखेर आईच्या स्वाधीन…..

तब्बल ७ तास राबवली शोध मोहीम : मालवण पोलिसांसह स्थानिकांचा सहभाग

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा मुलगा (बालक) दिसून आले. भटक्या कुत्र्यांनी त्या बालकाला घेरले होते. दरम्यान मालवण पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्या बालकाला आपल्या सोबत घेऊन मालवण ग्रामीण रुग्णालय येथे तपासणी करून वैद्यकीय निरराणी खाली ठेवले. त्या मुलाच्या पालकांचा शोध सुरु करण्यात आला. तब्बल सात तास शोध मोहीम नंतर मुलाच्या पालकांचा शोध लागला. बस स्थानक मागे राहणाऱ्या एका कामगार कुटुंबातील हे बालक असल्याचे स्पष्ट झाले. रात्री घराचा दरवाजा उघडा असताना बालक घराबाहेर गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

 

मालवण भरड परिसरात बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भटक्या कुत्र्यांच्या कळपाने घेरलेल्या स्थितीत दीड ते दोन वर्षाचा मुलगा आढळून आला होता. सुदैवाने त्या मुलाला त्या भटक्या कुत्र्यांकडून कोणतीही दुखापत झाली नाही. मालवण पोलिसांना या बाबत माहिती मिळताच तातडीने मालवण भरड येथे दाखल होत.त्या मुलाला ताब्यात घेऊन मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.तर त्या मुलाचे पालक कोण याचा शोध घेतला जात होता. मालवण शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा चेक करण्यात येत होती. पोलीस प्रशासना सोबत स्थानिक नागरिकांनी ही त्या मुलाच्या आई वडिलांच्या शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर सर्वांच्या प्रयत्नाला यश आले.

 

मालवण भरड परिसरात आढळून आलेला मुलगा हा मालवण एसटी स्टॅण्ड मागील परिसरात राहणारे परप्रांतीय कामगार कुटुंबातील असल्याचे स्पष्ट झाले. रात्री घराचा दरवाजा उघडा असताना मुलगा घरा बाहेर गेला.. सुदैवाने तो मुलगा भटक्या कुत्र्यां पासून बचावला आहे. ७ तासाच्या शोध मोहिमे नंतर आई आणी मुलाची भेट झाली.