. आज संध्याकाळी ५. ०० वाजता आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा.
ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे देऊळवाडी येथे अज्ञात शिवप्रेमीनी रात्रीत उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जबाबदारी देऊळवाडी येथील शिवप्रेमीनी स्विकारल्यानंतर त्याची विधिवत प्रतिष्ठापना शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकादिनी म्हणजे ६ जून रोजी मोठ्या उत्साहात होणार आहे.सकाळ पासून कार्यक्रमाना सुरुवात होणार आहे.८.३० वाजता पुतळ्याची विधिवत प्रतिष्ठापना झाल्यावर रवळनाथ मंदिर ते देऊळवाडी पुतळ्या पर्यंत भव्य शिव रॅली काढण्यात येणार आहे. अखंड हिंदुस्थानच आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या या पूर्णाकृती पुतळ्याच्या स्थापनेमुळे गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुतळ्याच्या प्रतिष्ठापने नंतर होणाऱ्या पहिल्याच कार्यक्रमाला ग्रामस्थ तसेच शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी अशी विनंती देऊळवाडी ग्रामस्थ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.आज संध्याकाळी ५. ०० वाजता आमदार दीपक भाई केसरकर, आमदार डॉ. निलेश राणे यांची विषेश उपस्थिती असणार आहे.त्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.












