देवरूख (प्रतिनिधी):
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली येथील अंतिम वर्ष ‘बी. फार्म.’ आणि डी. फार्म (B. फार्म & D. Pharm) च्या विद्यार्थ्यांनी विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळवत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. संस्थेच्या प्रभावी शिक्षण प्रणाली आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळे यावर्षीच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये घवघवीत यश मिळाले आहे.
विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा तपशील खालीलप्रमाणे:
1. इंडो अमाइन्स लिमिटेड, डोंबिवली: पदे: सेल्स, मॅन्युफॅक्चरिंग, QC आणि QA विभागातील ‘ट्रेनी केमिस्ट’ यशस्वी विद्यार्थी: कु. सुजित गाडवे, कु. अथर्व मांडवकर, कु. सृष्टी शेलार, कु. ओंकार वाघमारे आणि कु. साहिल पिंपळे.
2. प्रसन फूड्स, रत्नागिरी:यशस्वी विद्यार्थी: कु. दिनांती देवस्थळी, कु. क्रांती साळवी आणि कु. सिद्धी पाटील.
3. एस २ एम (S2M), चेन्नई:यशस्वी विद्यार्थी: कु. अक्षय कोकारे आणि कु. सानिका झोरे.
4. गेब्स हेल्थकेअर सोल्यूशन्स, मुंबई: यशस्वी विद्यार्थी: कु. प्रियांका यादव.
या सर्व नामांकित उद्योगांनी संस्थेच्या महाविद्यालयावर जो विश्वास दाखवला आणि त्यांना त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी अमूल्य संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्राचार्यानी या सर्व कंपन्यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. रवींद्र माने साहेब आणि संस्थेच्या सर्व व्यवस्थापन सदस्यांचे विद्यार्थ्यांना नेहमीच निरंतर प्रोत्साहन आणि मोलाचे पाठबळ लाभत असते, ज्यामुळेच हे यश साकार करणे शक्य झाले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. अमोल बी. खाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ‘प्रशिक्षण व प्लेसमेंट’
विभागाचे समन्वयक श्री. व्ही. एस. कुलकर्णी आणि श्री. जी. पी. तुळसणकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. संस्थेचे व्यवस्थापन मंडळ, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांच्या या दमदार यशामुळे प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम कौशल्य विकास आणि प्रभावी प्लेसमेंटची’ उज्ज्वल परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.













