राजापूर | प्रतिनिधी : तालुक्यातील नाणार शिंदेवाडी येथे भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबटयाला वनविभागाने सुखरूप विहिरीबाहेर काढत जीवदान दिले आहे. या बिबटयाची वैद्यकिय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. तशी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे. सदर बिबट्या हा साधारण दिड वर्षाचा असुन ती बिबटयाची मादी आहे. तशी माहीती वनविभागाने दिली आहे.
शनिवारी 12 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नाणार शिंदेवाडी, येथील कृष्णा शंकर पातले यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्या असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य ओंकार रामकृष्ण पेडणेकर यांनी राजापूर वनपाल सदानंद घाटगे यांना दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांना भ्रमणध्वनीवरून वनपाल घाडगे यांनी ही माहिती दिली .
त्यानंतर वनविभागाच्या रेस्कुटीमने जागेवर जाऊन पाहणी केली असता भक्षाचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडला असल्याचे दिसून आले. विहीर जवळपास तिस फुट खोल असुन घेरी पंधरा फूट आहे विहिरीचा काठ ठिसूळ असुन सतत माती व दगड पडत होते. त्यानंतर या विहिरीतुन बिबट्याला पिंजऱ्यात घेणे साठी पिंजरा विहिरीत सकाळी 9. 40 वाजता सोडण्यात आला. जवळपास अर्धा तासानंतर 10.15 वाजता बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षित आला .
सदर बिबट्या हा साधारण दिड वर्षाचा असुन ती बिबटयाची मादी आहे. या बिबटयाची पशुसंवर्धन अधिकारी राजापूर यांच्या कडून वैद्यकीय तपासणी करून घेतली असता तो सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर रत्नागिरी विभागीय वनाधिकारी दिपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या सनैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या बिबटयाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी करण्यात आलेल्या रेस्कु ऑपरेशन कामगिरीसाठी वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार, राजापूर वनपाल सदानंद घाडगे, राजापूर वनरक्षक विक्रम कुंभार, रेस्कु टीम राजापूरचे दिपक म्हादये, विजय म्हादये, नितेश गुरव, प्रथमेश म्हादये , निलेश म्हादये व इतर स्थानिक ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले आहे.











