संगमेश्वर तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षाचं

गौरव पोंक्षे माखजन:
२५ मे नंतर संगमेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात पेरा करण्यात आला आहे.गेले सहा सात दिवस तालुक्यात मळभी वातावरण आहे.आजूबाजूच्या तालुक्यात मान्सून पूर्व पाऊस बारसल्या च्या बातम्या येत असल्या तरी संगमेश्वर तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहेत
ढग दाटून येत आहेत,विजा देखील चमकत आहेत.परंतु पाऊस होत नसल्याने ,शेतकरी वर्ग चातकासारखा ढगांकडे डोळे लावून बसला आहे.भात पेरणी पूर्ण होऊन अनेक दिवस झाले आहेत.भात पेरणी वर पाऊस न झाल्याने भात रुजलेले नाही.यामुळे पाळीव कोंबड्या,रान कोंबड्या,कवडे,कबुत्तरे,चिमण्या भात फस्त करत आहेत.अशीच परिस्थिती कायम राहिल्यास दुबार पेरणीचे संकट आहे.
पावसाळी वातावरण गेले सहा सात दिवस पाहायला मिळत आहे.काही ठिकाणी पाऊस शिंतडत आहे.पण दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे.पावसाअभावी वाढलेली उष्णता यामुळे अंगाची लाही लाही होत आहे.कुंद असलेल्या वातावरणाचे ,दमदार पावसात केव्हा रूपांतरण होणार याची प्रतीक्षाचं आहे.