नेहरूंचा विक्रम मोडत मोदींचा नवा इतिहास ; वैभववाडी भाजपा कार्यकर्त्यांकडून उत्साहात जल्लोष
वैभववाडी l प्रतिनिधी :सलग ४३९९ दिवसांचा अखंड कार्यकाळ पूर्ण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास रचला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या ४३९७ दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मागे टाकत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे पंतप्रधान म्हणून नवा टप्पा गाठला आहे.
या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपच्या वतीने शहरातील दत्त मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, भाजपा प्रवक्ते भालचंद्र साठे, सरचिटणीस संजय सावंत, महिला मोर्चा अध्यक्षा प्राची तावडे, उपसभापती साची कोलते, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, जिल्हा परिषद सदस्या श्रावणी रावराणे, युवा मोर्चा अध्यक्ष अतुल सरवटे, माजी चेअरमन महेश संसारे, पंचायत समिती सदस्या सुवर्णा संसारे, बंड्या मांजरेकर, रितेश सुतार, नगरसेवक रोहन रावराणे, प्रदीप नारकर, परशुराम इसवलकर, अनंत नेवरेकर, बंधू वळंजू, संगीता चव्हाण, श्री. मसुरकर, श्री. मोहिते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाआरतीनंतर उपस्थितांनी पंतप्रधान मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली तसेच देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात आनंदोत्सव साजरा केला.













