“राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज” सामाजिक व साहित्य पुरस्कार संतोष चिले यांना.ओटवणे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

ओटवणे (प्रतिनिधी )        ओटवणे गावचे सुपुत्र आणि साहित्यिक संतोष चिले यांना या वर्षीचा राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व साहित्य पुरस्कार जाहीर झाला. सातारा,वाई के. एस. आय. पब्लिकेशन महाराष्ट्र राज्य आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिरग नक्षत्र’ राज्यस्तरीय ५ व्या कवी संमेलनानिमित्त, यावर्षीचा मानाचा राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व साहित्य पुरस्कार – २०२६’ जाहीर करण्यात आला आहे.आणि या पुरस्कारासाठी

ओटवणे गावचे सुपुत्र असणारे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. संतोष चिले यांना त्यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आणि सृजनशील लेखणीसाठी प्रदान करण्यात आला आहे.

‘मिरग नक्षत्र’ हे साहित्य, संस्कृती आणि संवेदनांचा संगम असलेले व्यासपीठ असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.संतोष चिले यांना ७ जून २०२६ रोजी वाई (जि. सातारा) येथील रमेस गरवारे सभागृह, लोकमान्य टिळक वाचनालय येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.

या पुरस्कारामुळे मराठी साहित्याच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या लेखकांचा गौरव होऊन नवी पिढी साहित्याकडे अधिक उत्साहाने आकर्षित होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला .या कार्यक्रमाची सुरुवात

सकाळी १० संध्या. ५ अशी होती या वेळेत सलग चाललेल्या या सोहळ्यात कवी संतोष चिले यांनी एकापेक्षा एक सरस उत्कृष्ट कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली उपस्थिताना खिळवून ठेवले.या कार्यक्रमा निमित्त साहित्यिकांचे दर्जेदार काव्य सादरीकरण आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याने या ‘मिरग नक्षत्र’ संमेलनाची रंगत वाढत गेली .कवी संतोष चिले हे अफाट बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व त्यांच्या अनेक कविता साहित्य यामुळे त्यांचा अनेक ठिकाणी गौरव करण्यात येत आहे त्यांनी साहित्यासाठी दिलेलं योगदान आणि तपच्छर्या याच फलश्रुत म्हणजे त्यांना मिळालेला राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व साहित्यिक पुरस्कार. या पुरस्कारामुळे त्यांचे विविध स्तरातून कौतुक तसेच अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांनी या मिळालेल्या सन्माना बद्दल कृतज्ञता व्यक्त करत या पुरस्कारमुळे साहित्य क्षेत्रात अजून खूप काही करण्यासाठी बळ मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्यात.पुरस्कार देवून सन्मानित केल्याबद्दल आयोजकांचे आभारही मानलेत.