आबलोलीतील दुर्गम धनगरवाडीत अहिल्यादेवी होळकर जयंती गुहागर (प्रतिनिधी):
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पंचायत समिती उपसभापती नीलेश सुर्वे यांनी आबलोली गावातील दुर्गम धनगरवाडी येथे जाऊन साजरी केली. यावेळी धनगरवाडीच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही सुर्वे यांनी दिली.
धनगर समाजासाठी अस्मितेचे आणि मानाचे व्यक्तिमत्व असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पहिल्यांदाच कोणी ना कोणी राजकीय व्यक्तिमत्व आमच्या वाडी वस्तीवर आल्याचे समाधान या सर्व
वाडीतील बांधवांनी व्यक्त केले आहे.
यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष विनायक सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, तसेच पडवे शक्ती केंद्रप्रमुख विक्रांत पागडे व पदाधिकाऱ्यांसह आबलोली
धनगरवाडी येथील पांडुरंग भागोजी बोडेकर, सखाराम येमाजी खरात, शंकर येमाजी खरात, प्रकाश शांताराम बोडेकर, अनिता पांडुरंग बोडेकर, लक्ष्मी लक्ष्मण बोडेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.