सचिन काष्टे यांनी जपला कलेचा वारसा; बांधकाम कलेसोबत सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही उमटवला ठसा
संगमेश्वरचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून सगळीकडे निर्माण केली स्वतःची वेगळी ओळख
देवरूख (प्रतिनिधी):
एखाद्या व्यक्तीकडे जिद्द, प्रामाणिकपणा आणि कलेची आवड असेल तर तो कोणत्याही क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो. संगमेश्वर तालुक्यातील माभळे येथील सचिन बाळू काष्टे यांनी हेच सिद्ध करून दाखवले आहे. चिरा, वीट, मार्बल, ग्रॅनाईट आदी साहित्यांपासून आकर्षक तुळशी वृंदावन, देव्हारे, किचन डिझाईन्स, फोटो फ्रेम्स आणि विविध कलात्मक वस्तू तयार करून त्यांनी आपल्या कलेची वेगळी छाप उमटवली आहे.
छोटे बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत असलेले सचिन काष्टे बांधकाम, प्लास्टर, लादी, कडाप्पा, मार्बल, ग्रॅनाईट तसेच इतर विविध कामे अत्यंत प्रामाणिकपणे करतात. कोणत्याही कामाची संपूर्ण माहिती ग्राहकांना देऊन, चेहऱ्यावर कायम हास्य ठेवत काम पूर्ण करणे ही त्यांची खास ओळख आहे. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक ग्राहकाकडे समान दृष्टीकोनातून पाहण्याची त्यांची वृत्ती अनेकांच्या मनात आदर निर्माण करते. विशेष म्हणजे अत्यंत गरजू व्यक्तींसाठी त्यांनी अनेकदा मोबदल्याचाही विचार न करता मदतीचा हात पुढे केला आहे. सचिन कास्टे यांना बांधकाम क्षेत्राचे प्राथमिक मार्गदर्शन त्यांचे वडील बाळू काष्टे, ठेकेदार दीपक संसारे व मार्बल, ग्रॅनाईट डिझाईनसाठी त्यांना राजस्थानी कारागीर यांचे मार्गदर्शन लाभले.
कलेची प्रंचड आवड असल्याने त्यांनी ती कला लवकर आत्मसात केली. ते उत्तम चित्रकार देखील आहेत.
विशेष म्हणजे ते हे बांधकाम क्षेत्र सांभाळून नमन, नाटक, वेबसिरीस, शॉर्ट फिल्म, मराठी सिनेमात काम करत या वेगळ्या कलेकडेही ते आवडीने वेळ देतात.
त्यांना यावर्षी कला आणि सामाजिक क्षेत्रासाठी तब्बल ५ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले
एवढे असूनही ते अगदी साधेपणाने राहतात हे विशेष. विविध कलाक्षेत्रांमध्ये आपल्या अभिनय आणि कलागुणांची छाप त्यांनी उमटवली आहे. कला आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल यावर्षी त्यांना तब्बल पाच राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. एवढी यशस्वी वाटचाल करूनही सचिन कास्टे यांचा साधेपणा आणि माणुसकी जपण्याचा स्वभाव आजही कायम असून, त्यामुळेच ते संगमेश्वर तालुक्यातील अष्टपैलू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात आहेत.










