मा.पं.शि.प्र. मंडळाच्या अध्यक्ष पदी शशिकांत घाणेकर तर उपाध्यक्ष पदी राजेश फणसे

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी शशिकांत घाणेकर यांची निवड झाली.तर राजेश फणसे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली.
नुकत्याच झालेल्या मासिक सभेत हा निर्णय झाला.तीन वर्षाच्या कार्यकारी मंडळातील चौथे अध्यक्ष आहेत.शशिकांत घाणेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर,उपाध्यक्ष पद रिक्त झाले.या जागी राजेश फणसे यांची निवड झाली.
या निवडी वेळी,सचिव श्रीकांत फाटक, सहसचिव दीपक शिगवण,सुभाष सहस्त्रबुद्धे,हनीफ म्हाते,किशोर साठे,डॉ.दत्तात्रय बापट,आदी उपस्थित होते.यावेळी मुख्याध्यापक महादेव परब यांनी सहकाऱ्यांसमवेत शुभेच्छा दिल्या.
शशिकांत घाणेकर यांची अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी राजेश फणसे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.