दोडामार्ग: सुहास देसाई
कसई-दोडामार्ग नगरपंचायत हद्दीत विविध विकासकामांचा भव्य लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा दिनांक १५ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. श्री. नितेश राणे यांच्या शुभहस्ते या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे.
यामध्ये तळ्याचे सुशोभीकरण (लोकार्पण) ‘सिंधुरत्न समृद्ध योजने’ अंतर्गत कसई-दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील राज्यमार्ग क्रमांक १८९ लगत असलेल्या तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून, याचे लोकार्पण केले जाईल. नमो गार्डन भूमिपूजन होणारआहे यात’वैशिष्ट्यपूर्ण योजने’ अंतर्गत नगरपंचायत हद्दीत नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या ‘नमो गार्डन’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळाही यावेळी पार पडणार आहे.
या सोहळ्याला खासदार नारायणराव राणे (लोकसभा सदस्य, रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
आमदार निलेश राणे (विधानसभा सदस्य) दिपकभाई केसरकर (विधानसभा सदस्य)
आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रमोद जठार, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे (विधानपरिषद सदस्य)
श्रीम. तृप्ती धोडभिसे (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
श्री. रविंद्र खेबुडकर (भा.प्र.से.) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
श्री. मोहन दहिकर – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
श्री. संकेत गायकवाड – मुख्याधिकारी
या सोहळ्याचे आयोजन नगराध्यक्ष श्री. चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष श्री. देविदास गवस, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीम. संजना म्हावळणकर यांच्यासह कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि कर्मचारी वृंद यांनी केले असून सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.












