यशस्वी उपचाराची आणखी एक नोंद SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे येथे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णाला मिळाला यशस्वी उपचाराचा दिलासा

माधवी वंजारे या रुग्णाला डाव्या गालाच्या भागात (Left Infraorbital Space) गंभीर संसर्ग तसेच Oroantral Communication ही गुंतागुंतीची समस्या होती. चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात सूज, वेदना व संसर्ग असल्याने रुग्णाला जिल्ह्याबाहेरील रत्नागिरी किंवा कोल्हापूर येथे उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.

 

मात्र रुग्णाने SSPM Medical College and Lifetime Hospital, Padve, Sindhudurg येथे भेट दिली. येथे तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णाची सखोल तपासणी करून परिस्थिती समजावून सांगितली व आवश्यक उपचारांची माहिती दिली.

 

उपचारामध्ये खालील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या : • Closure of Oroantral Communication

• Incision and Drainage of Left Infraorbital Space Infection

 

सदर उपचार डॉ. प्राची बेके (MDS Oral & Maxillofacial Surgery यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले. उपचारानंतर अवघ्या ७ दिवसांत रुग्णाच्या चेहऱ्यावरील सूज व संसर्गामध्ये लक्षणीय घट झाली असून रुग्णाची प्रकृती उत्तम आहे.

 

रुग्णाने तसेच त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर व संपूर्ण कर्मचारी वर्गाचे आभार मानले. “कमी खर्चात, योग्य व तज्ज्ञ उपचार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध झाले आहेत,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

 

 

SSPM Medical College and Lifetime Hospital, Padve, Sindhudurg

“तज्ज्ञ सेवा, आधुनिक उपचार आणि रुग्णकेंद्री आरोग्यसेवा”