गौरव पोंक्षे | माखजन
सावर्डे नजीक जिल्हा परिषदेच्या मांडकी शाळा नं ३ घाणेकरवाडी मध्ये मोफत छत्री वाटप झाले. मुंबई स्थित उच्च पदस्थ ग्रामस्थ रोहित रामचंद्र घाणेकर यांनी इयत्ता तिसरी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना छत्र्यांचे वाटप केले.व खाऊ दिला.
यावेळी मुख्याध्यापक संकेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत केले.यावेळी नवागतांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत झाले.व विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी सौ शुभांगी घाणेकर, दत्ताराम घाणेकर,अनंत घाणेकर,तेजस घाणेकर,राजेश पवार,सौ संचिता सावर्डेकर,प्रसन्न जाधव,सामाजिक कार्यकर्ते बाबाजी घाणेकर,प्रकाश हुमणे व विविध कमिट्याचे पदाधिकारी उपस्थित होते.












