राजापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांनी केले प्रवेशकर्त्यांचे स्वागत

राजापूर | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या बुधवारी झालेल्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यात राजापूर तालुक्यातील विविध गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आ. चव्हाण यांनी पक्षात स्वागत केले. राजापुर शहरातील तरूण कार्यकर्त्यांसह नाटे ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच अन्य पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतले आहे.

राजापुर तालुक्यातही भाजपाची संघटनात्मक ताकद वाढत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातुन होणारी विविध विकास कामे आणि भाजपाची ध्येय धोरणे यावर विश्वास ठेऊन अनेक गावातील लोक भाजपात दाखल होत आहेत. बुधवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण हे रत्नागिरी जिलहा दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्हाभरातील विविध तालुक्यातुन अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यामध्ये राजापूर तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले आहे.

यामध्ये राजापूर शहरातून सुशांत मराठे, संदेश करगुटकर, मयूर चिपटे, शिवा पवार, संकेत गुरव यांनी तर नाटे गावातून शाखाप्रमुख, दिवाकर दळवी, प्रभाकर साळवी, हरी साळवी, दीपक गिजम, दत्ता गिजम, सुनील कामतेकर ग्रामपंचायत सदस्य, अनिल जवरे, रमेश थळेश्री, सुभाष साळवी, सुवर्णा गावकर ग्रामपंचायत सदस्य, श्रुतिका सच्चिदानंद बांदकर ग्रामपंचायत सदस्य, संजय चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, विनायक थळेश्री, सिद्धेश थळेश्री, निळकंठ थळेश्री, परेश लकळे, नितीन मांजरेकर, श्रीधर मांजरेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला. तर पाचल मधून राष्ट्रवादी महिला अध्यक्ष प्रगती पांडुरंग रेडीज, प्रतिक्षा अजित लांजेकर, सुवर्णा सुर्यकांत मिझार्की, वर्षा लुकाराम खवळे, पांडुरंग भिकु रेडीज, शुभांगी सुरेश शेळके, रिसमा संतोष बेडे, भारती वासुदेव शेट्ये, पंढरीनाथ चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. तर उन्हाळे गावातुन चंद्रकांत पळसमकर माजी सरपंच, तेजस पळसमकर, कमळाकर पुजारे, रोहीत मोंडे, सुरेश मोंडे, राजन पवार माजी तंटा मुक्ती अध्यक्ष यांनी भाजपात प्रवेश केला.

तर अन्य विविध गावांतुन झालेल्या प्रवेशकर्त्यांमध्ये सुगंध ठाकरे, कृष्णा आंबोळकर, प्रकाश आंबोळकर, चंद्रकांत आंबोळकर, राजेंद्र आंबोळकर शाखाप्रमुख, भरत नार्वेकर, महेंद्र आंबोळकर, सुबोध आंबोळकर, राजेश चौधरी, सुदेश मयेकर, सिद्धार्थ शेट्टे, प्रभाकर वाडेकर, कृष्णा पेडणेकर, अक्षय मयेकर, मनीष मसुरकर आदींचा समावेश आहे. या सर्व प्रवेशकर्त्यांचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण साहेब यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून “विकसित महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करू” असे आवाहन केले.

या पक्षप्रवेश सोहळ्यास आमदार प्रमोद जठार, माजी मंत्री योगेश सागर, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा सरचिटणीस तथा उपसभापती अभिजित गुरव, तालुका अध्यक्ष मोहन घुमे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रुती ताम्हनकर, तालुका उपाध्यक्ष रेणुका गुडये, शीतल रहाटे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सुधा चव्हाण, ओबीसी तालुका अध्यक्ष संदीप तेरवणकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.