रत्नागिरी:
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरीत भव्य ‘मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘आ. निलेशजी राणे मित्र मंडळ, रत्नागिरी’ आणि इन्फिगो आय केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ज्या गरजू रुग्णांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
नाव नोंदणी आणि संपर्कासाठी :
रुग्णांनी नाव नोंदणीसाठी खासदार नारायणराव राणे संपर्क कार्यालय, आरोग्य मंदिर, रत्नागिरी येथे किंवा खालील प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा:
अमोल देसाई: 8999251217
नरेश बनसोडे: 9158161085
सोम पिलणकर: 7972924778
अभी कारेकर: 7057576474
निखिल शेट्ये: 8446255751
शैलेश बेर्डे 8329275621
सर्व गरजू रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.












