खेड (प्रतिनिधी) : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचलित कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगावच्या उच्च माध्यमिक विभागाने यंदाच्या MHT-CET परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. PCM गटात सफा उस्मान चौगले हिने 99.58 पर्सेंटाईल मिळवून तर PCB गटात रुषाली राजाराम कदम हिने 95.58 पर्सेंटाईल मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
PCM गटातील एकूण 103 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 23 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवून यश संपादन केले आहे. यामध्ये सफा उस्मान चौगले हिने 99.58 पर्सेंटाईलसह प्रथम क्रमांक मिळविला. शमिका सुधीर शिंदे हिने 99.13 पर्सेंटाईलसह द्वितीय, यश किशोर आग्रे याने 98.20 पर्सेंटाईलसह तृतीय, पार्थ सूर्यकांत पुजारी याने 97.72 पर्सेंटाईलसह चौथा तर राधिका अमित रांगडे हिने 97.19 पर्सेंटाईलसह पाचवा क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे PCM गटातील एकूण 37 विद्यार्थ्यांनी 85 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळविले आहेत.
PCB गटातही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. एकूण 78 विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळविले आहेत. रुषाली राजाराम कदम हिने 95.58 पर्सेंटाईल मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. महंमद कैफ कबीर देसाई याने 95.43 पर्सेंटाईलसह द्वितीय, श्लोका योगेश जैतपाल हिने 94.81 पर्सेंटाईलसह तृतीय, पार्थ सूर्यकांत पुजारी याने 94.25 पर्सेंटाईलसह चौथा तर स्वरा नंदकुमार घाणेकर हिने 93.16 पर्सेंटाईलसह पाचवा क्रमांक मिळविला. PCB गटातील एकूण 23 विद्यार्थ्यांनी 85 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवून प्रशालेच्या यशात भर घातली.
या यशामागे प्रशालेतील कोटा पॅटर्नचे मार्गदर्शक शिक्षक रवींद्र गंगवार, ब्रिजेश रॉय, विठ्ठल सकुंडे, कांतिनाथ शिंदे, देवेंद्र पटेल, रुत्विक सिंग, अभिजीत शेळके, अश्विनी पाटील, सुभाषचंद्र तिवारी, पंकज हालके, मकरंद दाबके, अरविंदकुमार वर्मा, सतीश माने आणि साधना थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, संस्था सदस्य रुपल पाटणे तसेच सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Home महत्वाच्या बातम्या ज्ञानदीप भडगावचा MHT-CET मध्ये दैदिप्यमान यश; सफा चौगले व रुषाली कदम प्रशालेत...












