‘मेरी मिट्टी मेरा देश ‘ अंतर्गत आरोंदा ग्रामपंचायततर्फे माजी सैनिकांचा सन्मान

गावात ७५ साग वृक्षांचीही लागवड

सावंतवाडी । प्रतिनिधी : मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत सोमवार १४ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत आरोंदा येथे ध्वजारोहण, शिलाफलक अनावरण तसेच अमृत रोपवाटिका अंतर्गत ७५ साग जातीचे वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच माजी सैनिक सत्कार समारंभ संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी मा.सरपंच श्रीम.वेळणेकर, उपसरपंच श्री.सुभाष नाईक, ग्रामपंचायत सर्व सदस्य,ग्रा.वि.अ.श्री.सतीश राणे , अंगणवाडी सेविका,आशाताई, ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग, कृषी सेवक,आरोग्य कर्मचारीवर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.माजी सैनिक सत्कार कार्यक्रमात बोलताना मा. सरपंच म्हणाल्या की, गावातील माजी सैनिक हे गावची छान असुन आम्हा गाववासीयांना आपला गर्व व सार्थ अभिमान आहे.आपण बजावलेल्या कर्तव्यामुळे आरोंदा गावचे नाव देशभरात प्रसिद्ध झाले आहे,अशा शब्दात त्यांनी माजी सैनिकांचा गौरव केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्राम विकास अधिकारी सतीश राणे यांनी केले.सत्कार कार्यक्रमापुर्वी ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करण्यात आले. नंतर कन्याशाळा येथे शिलाफलक अनावरण मा.सरपंच ,उपसरपंच यांचे हस्ते करण्यात आले. तद्नंतर जि.प शाळा नं. १ आणि रेडकरवाडी स्मशानभूमीत साग जातीच्या ७५ वृक्षांचे लागवड करण्यात आली.