हेदूळ येथे एकल महिला दिनास प्रतिसाद!

मसुरे | झुंजार पेडणेकर ग्रामपंचायत हेदुळ येथे मंगळवारी एकल महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ प्रतिक्षा प्रमोद पांचाळ या होत्या. ग्रामपंचायत सदस्या सौ प्रीती पंकज सावंत, अदिती प्रशांत शेमडकर ,सौ.अनिता अंकुश घाडी उपस्थित होत्या. यावेळी गावातील 32 एकल महिलांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. एकल महिलांच्या संघर्षमय जिवंत प्रवास,आत्मविश्वास जिद्द आणि समाजातील योगदानाचा गौरव करण्याचा उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे सरपंच सौ प्रतीक्षा पांचाळ यांनी सांगितले. यावेळी श्रीमती शितल सत्यवान पुजारे आणि श्रीम सारिका सचिन चव्हाण यांनी आपल्या आपल्या जिवन प्रवासाबाबत मनोगत व्यक्त केले. त्यांच्या अनुभवांनी उपस्थित भावनिक झाले. अंगणवाडी सेविका सरिता गावडे,साधना सावंत,रुपाली वांगवडेकर, सिआरपी मयुरी हेदुळकर, आशा सारिका चव्हाण,तलाठी सौ शीरटीकर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सौ. एम एस पिळणकर यांनी देखील शासकीय योजनांविषयी माहिती देऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यानी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी सौ एम. एस. पिळणकर यांनी केले.