ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे कापईवाडी येथील चंद्रकांत चव्हाण यांच्या राहत्या घरात चोरट्याने मोठ्या शीताफिने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातील लॉकर मधील १ लाख रुपयाची रोकड लंपास केली.
ही चोरीची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली. जोरदार सुरु असणाऱ्या पावसाचा आणि घरात कुणीही नसल्याचा चोरट्याने फायदा उठवीला.त्यातच जवळपास शेजारी कुणाचे घर ही नसल्याने ही घटना कुणाच्याही लक्षात आली नाही.ज्यावेळी संध्याकाळी उशिरा चित्रा चव्हाण या घरी आल्यावर त्यांना घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले दरवाजा ढकलत नसल्याने त्यांनी मागच्या दरवाजातून आत प्रवेश केला तर आतून दरवाजाला कडी घातल्याचे लक्षात आले खोलीत गेल्यावर कपाट उघड असल्याचे लक्षात आले तर आतील लॉकर उघडे दिसले त्यांच्या ही बाब लक्षात आली की घरात चोरट्यानी रोकड लंपास केली.त्यांनी ही बाब इतरांच्या कानावर घातली त्वरित पोलीस पाटील शेखर गावकर यांना फोन करून सांगितले.पोलीस पाटील शेखर गावकर यांनी सावंतवाडी पोलीस स्थानकात याची खबर देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण,पी. एस. आय.माधुरी मुळीक उपनिरीक्षक मनोज राऊत,हेड कॉन्स्टेबल मंगेश शिंगाडे,दाखल झाले असून याचा अधिक तपास करीत आहेत.श्वान पथकही दाखल झाले असून तपास सुरु आहे .














