कोल्हापूरचे माजी महापौर महादेव आडगुळ यांच्या अवघ्या १७ वर्षाच्या नातवाची आत्महत्या…

कारण अद्याप अस्पष्ट…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर: कोल्हापुर महानगरपालिकेचे माजी महापौर आणि जेष्ठ विधिज्ञ महादेव आडगुळे यांच्या नातवाने आत्महत्या केली आहे. रौनक इंद्रजीत आडगुळे (१७) असे नातवाचे नाव आहे. रौनकने अचानक जीवन संपवल्याने आडगुळे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रौनकने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ येथील राहत्या घरी रौनकने आत्महत्या केली असून पुढील तपासणीसाठी त्याचा मृतदेह छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.

रौनकचे आजोबा महादेव आडगुळे यांची कोल्हापुर पंचक्रोशीत ज्येष्ठ वकील अशी ओळख आहे. ते कोल्हापुर महापालिकेचे महापौर राहिलेले आहेत. तर रौनकचे वडिल इंद्रजीत आडगुळे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत.

अवघ्या १७ वर्षाच्या हसत्याखेळत्या मुलाने अशा पद्धतीने आयुष्य संपवल्याने कुटुंब आणि मित्रपरिवारामध्ये शोककळा पसरली आहे.

रौनकने नुकतीच १२ वी ची परीक्षा दिली होती. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.