गौरव पोंक्षे माखजन:
ज्या काळात स्त्रियांना समाजात सन्मानाची वागणूक दिली जात नसे,अशा काळात छत्रपती शाहू महाराजांनी स्त्रियांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी अमोल कार्य केले.असे प्रतिपादन सचिन साठे यांनी केले.त्यांनी माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल ,ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त कार्यक्रमात बोलत होते
ते पुढे म्हणाले की १९१७ साली मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाला सुरवात करून,समाजाला वेगळी आणि प्रगतीची दिशा दिली.शेतकरी व कामगारांना अनेक कार्यात प्रोत्साहन देत खरा राजाश्रय दिला असे नमूद केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देखील मनोगते व्यक्त केली.प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव परब यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमांचे आभार पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी मानले.












