रत्नागिरी: प्रतिनिधी
आज ज्येष्ठ शुद्ध पूर्णिमा, म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जाणारा वटपौर्णिमेचा सण! रत्नागिरी शहरातही आज वटपौर्णिमेचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला असतानाही, सुवासिनी महिलांनी पावसाची पर्वा न करता मोठ्या आनंदाने आणि पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला.
विठ्ठल मंदिर परिसर नटला मराठमोळ्या थाटात
रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध विठ्ठल मंदिराच्या परिसरात आज सकाळपासूनच महिलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. पारंपरिक पद्धतीचे दागिने, नऊवारी-सहावारी साड्या आणि नाकात नथ अशा मराठमोळ्या वेशभूषेत सजलेल्या सुवासिनींचा थाट आज या सणाचा आनंद द्विगुणित करत होता. पावसाच्या पडणाऱ्या सरींमध्ये भिजत असतानाही महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
‘जन्मोजन्मी हाच पती मिळू दे’ची आर्त साद
वडाचं झाड हे दीर्घायुष्याचं आणि मजबुतीचं प्रतीक मानलं जातं. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्माच्या साथीसाठी आज सुवासिनींनी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली.
“जन्मोजन्मी हाच पती मिळू दे आणि आमच्या कुटुंबाला सुख-समृद्धी लाभू दे,” या प्रार्थनेसोबतच महिलांनी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून, सूत गुंडाळून आपल्या भावना व्यक्त केल्या.
“जन्मोजन्मी हाच पती मिळू दे आणि आमच्या कुटुंबाला सुख-समृद्धी लाभू दे,” या प्रार्थनेसोबतच महिलांनी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून, सूत गुंडाळून आपल्या भावना व्यक्त केल्या.
पावसाचा जोर कायम असतानाही रत्नागिरीतील महिला वर्ग भिजून, निसर्गाच्या साक्षीने हा सण अत्यंत भक्तीमय आणि आनंदी वातावरणात साजरा करताना दिसत आहे. एकूणच, आज रत्नागिरी शहरात वटपौर्णिमेच्या निमित्ताने पारंपरिक संस्कृती आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
Home महत्वाच्या बातम्या रत्नागिरीत पावसाच्या सरींमध्ये वटपौर्णिमेचा उत्साह; विठ्ठल मंदिर परिसरात सुवासिनींची अलोट गर्दी!












