कृषी दिनानिमित्त माखजन इंग्लिश स्कूल मध्ये वनऔषधी वनस्पतींची लागवड

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातीलौ माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल,माखजन,ॲड पी आर नामजोशी कला,वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आवारात कृषी दिनाचे औचित्य साधून,गुरुकुल पूरक उपक्रमांतर्गत,हरितसेना विभागाच्या संयुक्त विद्यमाने वनऔषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांना वन औषधी वनस्पती लागवडीचे महत्व व संवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले.आयुर्वेदाची असलेली भारतीय परंपरा व जागतिक स्तरावरील महत्व सांगण्यात आले. यावेळी नोनी,बेल,तुळस,जांभूळ,कोरफडं,हरडा,बेहडा अशी अनेक वन औषधी झाडें लावण्यात आली.यावेळी संस्थेचे सहसचिव. दीपक शिगवण,संचालक सुभाष सहस्त्रबुद्धे,मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,गुरुकुल विभाग प्रमुख सचिन साठे,हरित सेना प्रमुख विठ्ठल भोईर,शिक्षक प्रतिनिधी अमोल पाटील,शिक्षकेतर प्रतिनिधी चंद्रकांत सुर्वे,संतोष कुलकर्णी,सचिन कदम,अभिजित सहस्त्रबुद्धे,संतोष पड्यार व विद्यार्थी उपस्थित होते.