गौरव पोंक्षे | माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे सकाळी ७.३० च्या सुमारास मुंबई हून गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनर ला भीषण अपघात झाला.आरवली येथे उड्डाणंपूलाच्या अलीकडे आल्यावर गोव्याच्या दिशेने जात असताना ब्रेक लावल्यावर कंटेनर स्लीप झाला.व मागील कंटेनर रस्त्याच्या साईड वॉल वर आडवा झाला तर पुढील इंजिन चा भाग आरवली पुलाखाली येणाऱ्या सर्व्हिस रोड व उतरला.या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी.कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर आडवा झाल्याने वाहतूक मंदावली आहे.
कंटेनर रिकामा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.












