राष्ट्रभाषा हिंदी प्रवीण परीक्षेत युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणमधील सई खोडदेकर हिचे सुयश

चिपळूण (प्रतिनिधी) : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित युनायटेड इंग्लिश स्कूल मध्ये गेली अनेक वर्ष हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेचे केंद्र असून या केंद्राशी चिपळूण परिसरातील आठ शाळा संलग्न आहेत. मोठ्या संख्येने हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेला विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी येत असतात. बालबोधिनी, प्राथमिक, प्रवेशिका, सुबोध आणि प्रबोध या परीक्षेसाठी विद्यार्थी प्रविष्ट होत असतात. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्रवीण परीक्षेसाठी सई विनायक खोडदेकर ही विद्यार्थ्यांनी युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण या केंद्रावरून परीक्षेसाठी बसली होती व तिने त्यामध्ये सुयश प्राप्त केले आहे.
गतवर्षीचे मुख्याध्यापक आणि विद्यमान संचालक विभाकर वाचासिद्ध यांनी उत्तम सहकार्य केले. संस्थेतील सर्व संचालकांनी सईचे कौतुक केले. तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक संजय बनसोडे, उप मुख्याध्यापिका सौ .रेवती कारदगे, पर्यवेक्षक भगवान खाडे आणि संदीप मुंढेकर यांनी तिचे भरभरून कौतुक केले. यासाठी हिंदी विभागाच्या प्रमुख सौ. मानसी पेढांबकर यांनी सई खोडदेकर हिला योग्य मार्गदर्शन केले तसेच प्रोत्साहन दिले.