पूज्य गांधी प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत उमर शोएब खतीब प्रथम

चिपळूण (प्रतिनिधी) : गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूलमधील इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु. उमर शोएब खतीब याने पूज्य गांधी प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. उमरच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व मित्रपरिवाराकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेसाठी विद्यालयातील माध्यमिक शिक्षक व मराठी विषय शिक्षक योगेश पेढांबकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील कार्याचीही प्रशंसा होत आहे. या यशाबद्दल गोवळकोट एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ.इसहाक खतीब, व्हाईस चेअरमन जफर कटमाले, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.उरूसा खतीब, संस्थेचे सेक्रेटरी मुजाहिद मेयर, मुख्याध्यापक इरफान शेख, उपमुख्याध्यापक इम्रान महत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.