झाड हटवून रस्ता केला मोकळा : मालवण आचरा मुख्य रस्ता काही काळ ठप्प
मालवण | प्रतिनिधी : मालवण आचरा मुख्य रस्त्यावर कालावल पुलाच्या अलीकडे हडी येथे रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळल्याची घटना रविवारी सकाळी घडली.
दरम्यान, या मार्गांवरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ यांच्या मदत सहकार्यातून सार्वजनिक बांधकाम विभागाने झाड हटवून रस्ता मोकळा केला.












