यश गावडे च्या यशाने हातीव नं १ शाळेच्या शिरपेचात गुणवत्ता वाढीची मोहर

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात पहिल्या टप्प्यात अव्वल ठरलेली व जिल्हा स्तरावर तृतीय मानांकन मिळविलेल्या हातीव नं.१ शाळेचा विद्यार्थी यश महेश गावडे यांने शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात दहावा क्रमांक पटकावून गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळविला त्याच्या या यशाने शाळेच्या गुणवत्ता वाढीच्या शिरपेच्या मध्ये मानाची मोहर उमटली.

या परीक्षेसाठी शाळेचे पाच विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. ते सर्व १०० टक्के पास झाल्याने त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वर्गशिक्षिका रुपाली मांगले यांच्या शैक्षणिक कार्याचेही सर्व स्तरातून कौतुक होत आहे . यापूर्वी ही त्यांनी कांजीवरा देवरुख शाळेत आपले विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणले होते. या दुहेरी यशाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की देवरुख नं. २ बीट चे विस्तार अधिकारी तानाजी नाईक यांचे काटेकोर नियोजन व मार्गदर्शन केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक सुनिल करंबेळे यांनी सदैव दिलेली प्रेरणा पालकांचे, सहकारी शिक्षक यांचे सहकार्य व विद्यार्थ्याची मेहनत यामुळेच हे उज्ज्वल यश मिळाले . गत वर्षीही या शाळेतील विद्यार्थीनी स्वरा केसरकर हिने गुणवत्ता यादीत स्थान मिळविले होते.

शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उज्ज्वल यशा बद्दल त्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका रुपाली मांगले यांचे अभिनंदन सरपंच नंदकुमार कदम, उपसरपंच इक्कबाल साटविलकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संदिप गावडे, उपाध्यक्षा मानसी कारेकर, सर्व सदस्य पालक तसेच गुणवत्तेचा ध्यास घेतलेले तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी विजय परीट, बीट विस्तार अधिकारी तानाजी नाईक केंद्र प्रमुख एकनाथ चांदे, माजी मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख सुनिल करंबेळे, मुख्याध्यापक विनय होडे, माजी मुख्याध्यापक धोंडू करंबेळे, केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक यांनी केले आहे. यशचे वडील महेश गावडे हे सांगली येथे कामाला व आई गृहिणी आहे. त्यांना ही बातमी समजताच त्याना आश्चर्य वाटले. शिक्षिका मांगले यांनी वर्षभर घेतलेल्या कष्टाचे चीज झाले असे गौरवोद्गार काढून धन्यवाद दिले.