लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील भांबेड येथील ‘नवयुग उत्कर्ष युवक मंडळा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक ११ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता मंडळाच्या सभागृहातआयोजित करण्यात आली आहे.
या सभेचे अध्यक्षपद संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र लाड भूषवणार आहेत. या महत्त्वाच्या सभेमध्ये संस्थेच्या विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत.सभेपुढील मुख्य विषय खालीलप्रमाणे आहेत:मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे.आर्थिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक जमाखर्च आढावा घेऊन त्याला मंजुरी देणे.संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षकांची (Auditors) नेमणूक करणे आणि त्यांचा मेहनताना निश्चित करणे.आगामी ‘गणेश उत्सव २०२६’ चे अंदाजपत्रक मांडून त्यावर सविस्तर विचार विनिमय करणे.गणेश उत्सव २०२६ च्या मुख्य उत्सव सभेची तारीख आणि वेळ निश्चित करणे.
तसेच, सभासदांना काही सूचना मांडायच्या असल्यास त्यांनी सभेच्या एक दिवस आधी लेखी स्वरूपात मंडळाकडे जमा कराव्यात, असे मंडळाचे
पत्रकात नमूद करण्यात आले आहे.













