जामसंडे देवगड येथून उपचारासाठी आले होते मालवणात
मालवण | प्रतिनिधी : मालवण धुरीवाडा येथे नातेवाईकांकडे आलेल्या कृष्णराव गोविंद मणचेकर वय 65 रा. जामसंडे देवगड हे बेपत्ता झाल्याची माहिती त्यांचे नातेवाईक श्रुती एकनाथ आंबेरकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार मालवण पोलीस ठाण्यात नापता नोंद करून पुढील तपास सुरु आहे.
मणचेकर हे औषध, उपचार घेण्यासाठी मालवण धुरीवाडा येथील नातेवाईक आंबेरकर यांच्याकडे 4 जुलै रोजी पत्नीसह आले होते. त्यांनी डॉक्टरकडे औषध उपचार घेतले. त्यानंतर 5 जुलै रोजी सकाळी मणचेकर हे घरात कोणासही न सांगता निघून गेले. सर्वत्र शोधशोध करूनही त्यांचा शोध लागला नाही. अखेर आंबेरकर यांनी याबाबत मालवण पोलीस ठाण्यात माहिती दिली असून मालवण पोलीस पुढील तपास व शोध घेत आहेत.













