मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील देवबाग येथील नरेंद्र आनंद बांदेकर (वय 34) या तरुणाने घराच्या मागे असलेल्या रिसॉर्टच्या मीटर रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकास्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
नरेंद्र आनंद बांदेकर हे पदवीधर शिक्षित होते. तसेच त्यानी एमपीएससीची परीक्षाही दिली होती. चांगल्या नोकरीच्या शोधात होते.
घराच्या मागील बाजूस असलेल्या रिसॉर्टच्या मीटर रूम मध्ये रोज रात्री झोपायला जात. बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत मुलांसोबत कॅरम खेळल्यावर रूममध्ये झोपी गेले. गुरुवारी सकाळी बराच वेळ रूम मधून बाहेर न आल्याने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे काका रिसॉर्टच्या मीटर रूम मध्ये बघण्यासाठी गेले असता त्यांना नरेंद्र याचा मृतदेह रूमच्या छप्पराला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर मालवण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला. याबाबत अधिक तपास पोलीस कर्मचारी जितेंद्र पेडणेकर हे करत आहेत. नरेंद्र याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.













