राजापूर प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील रस्ते व पुलांची दुरवस्था दूर करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश आले आहे. तालुक्यातील तळवडे बौद्धवाडी ते इंजिनवाडी रस्त्यावरिल व ओणी तोरणवाडी ते चिखलगाव बौद्धवाडी रस्त्यावरील पूलांना ३ कोटी ५५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात झाला आहे. या दोन्ही महत्वपुर्ण पुलांना मंजूरी मिळून निधी उपलब्ध झाल्याने हे दोन्ही पुल पुर्ण होणार असून या भागातील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. या दोन्ही भागातील ग्रामस्थांनी आ. किरण सामंत यांचे आभार मानले आहेत.
राजापुर तालुक्यातील विकास कामांना प्राधान्य देताना आमदार किरण सामंत यांनी रस्ते, पुल यांसारख्या सेवा सुविधांकडे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला गेल्या वर्षभरात झपाटयाने गती मिळत आहे. तालुक्यातील सातत्याने शासनाकडे या कामांचा पाठपुरावा केला होता. त्यातुनच आता तालुक्यातील दोन महत्वपुर्ण पुलांच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये तालुक्यातीलव अर्जुना नदीवर (MDR-45) तळवडे बौद्धवाडी ते इंजिनवाडी रस्ता साखळी क्रमांक ५/७०० येथे नवीन पुलाचे बांधकाम करणे यासाठी २.५१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. तर ओणी तोरणवाडी ते चिखलगाव बौद्धवाडी रस्त्यावरील पूल बांधणे या कामाला १.०४ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.
या दोन्ही महत्त्वाच्या पुलांच्या बांधकामामुळे राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणींतुन कायमची सुटका होणार आहे. त्यामुळे दोन्ही गावातील स्थानिक ग्रामस्थांनी आ. किरण सामंत यांचे आभार मानले आहेत.
Home महत्वाच्या बातम्या आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्यांना यश, तालुक्यातील ग्रामीण भागातील दोन महत्त्वाच्या पुलांसाठी...













