पती-पत्नीच्या वादात संतापलेल्या नातजावयाने ६५ वर्षीय आजी सासला पेटवून दिले..

आजीसासू गंभीर जखमी…

कोल्हापूर: गडहिंग्लज तालुक्यातील हसूरसासगिरी येथे पती-पत्नीच्या भांडणाचा राग धरून नातजावयाने आजीसासूच्या अंगावर पेट्रोल टाकत त्यांना पेटवून दिले. या घटनेत ६५ वर्षीय आजीसासू गंभीर भाजल्या असून, संशयित आरोपी नातजावयाला गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी, नातजावई गुरुनाथ शशिकांत शिंदे (वय ३१, रा.चिंचवाडी, ता.गडहिंग्लज)याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गडिंग्लज पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, गुरुनाथ याचे प्रीती हिच्याशी सहा वर्षांपूर्वी लग्‍न झाले होते. आई-वडील नसल्‍याने प्रीती आजीकडेच माहेरासाठी जाणे-येणे करते. किरकोळ कारणातून वाद होत होते. या वादाला आजीसासूच जबाबदार असल्याचे गुरुनाथ याच्या डोक्यात होते. पंधरा दिवसांपूर्वी पती-पत्‍नीत जोरात वाद झाल्याने प्रीती मुलासह आजीकडे राहावयास गेली होती.

या वादाला आजीसासूच जबाबदार असल्याचे गुरुनाथ याच्या डोक्यात होते. काही दिवसांपूर्वी पती-पत्‍नीत जोरात वाद झाल्याने प्रीती मुलासह आजीकडे राहावयास गेली होती.

गुरुनाथने प्रीतीला फोन करून घरी येण्याबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला; मात्र ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने गुरुनाथला राग आला होता. याच रागातून त्या‍ने हसूरसासगिरीमध्ये घरी जाऊन आजीसासू सुलोचना कदम यांच्‍या अंगावर पेट्रोल ओतले. त्या‍ भाकरी करत असल्याने चुलीच्या जाळाचा भडका उडाला व त्या ४५% भाजून गंभीर जखमी झाल्या.
दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर त्यांना सेक्टर रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश मोरे करत आहेत.