दोडामार्ग :प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातील वाढती पाणीपातळी लक्षात घेता, प्रशासनाने सांडवा पुच्छ कालव्यातून (Tail Race Channel) अतिरिक्त पाण्याचा विसर्ग तिलारी नदीपात्रात सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना खबरदारीचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे नदीच्या प्रवाहात पावसाळ्यात पाणी अत्यंत स्वच्छ आणि पांढरेशुभ्र दिसत आहे.
तिलारी परिसरातील भागात . २० जुलै २०२६ पासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. धरणाच्या ‘रूल लेव्हल’नुसार (ROS व GOS) अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने नदीत सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दि. २४ जुलै २०२६ पासून दगडी धरणाच्या सांडव्यावरून पुच्छ कालव्याद्वारे पाणी नदीत प्रवाहित झाले आहे
सध्या धरण परिसरासह खरारी नाल्यातील आणि बाहेरील पाणलोट क्षेत्रातील पाणीही नदीत येत असल्याने तिलारी नदीची पाणीपातळी कधीही वेगाने वाढण्याची शक्यता आहे पाऊस वाढल्यास त्या कालावधीत नदीचा प्रवाह कधीही वाढू शकत असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी कोणीही नदीपात्रात उतरू नये.असे आवाहन जल सपंदा विभागाने केले आहे तसेच काही शेतकरी सायंकाळी गुरे व अन्य कामानिमित्त शेती सह बागायत ठिकाणी जातात त्यानी
रात्रीची ये-जा टाळावी व सुरक्षेचा उपाय म्हणून रात्रीच्या वेळी नागरिकांनी नदीपात्रातून किंवा त्यापुलावरून ये-जा करू नये.
महिला व शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिलांनी आणि गुरांना पाण्यासाठी नदीवर नेणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी.
गावात दवंडी देण्याचे निर्देश प्रशासनने दिले आहे नदीकाठच्या सर्व गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना पूर्वकल्पना द्यावी, असे निर्देश गाव प्रशासनाला देण्यात आले आहेत.
नदीकाठच्या सर्व ग्रामस्थांनी, पर्यटकांनी आणि शेतकऱ्यांनी जलसंपदा विभाग व स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.













