पाकिस्तानमधून पसरवल्या गेल्या फेक न्यूज
पाकिस्तानमधून चालवल्या जाणाऱ्या ४८० पेक्षा जास्त हँडल्सद्वारे आंदोलनाशी संबंधित बनावट आणि भडकावू कंटेंट पसरवले गेले
दिल्ली पोलिसांकडून अनेक मोठे खुलासे
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, पाकिस्तानकडून वेगळ्या प्रकारची घुसखोरी झाली. हा धक्कादायक प्रकार दिल्ली पोलिसांनी उघड केला .
CJP च्या प्रत्यक्ष आंदोलनात कोणताही पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किंवा नागरिक घुसलेला नाही. पाकिस्तानकडून हा घुसखोरीचा प्रकार मैदानावर झालेला नसून डिजिटल स्वरूपाचा आहे, जिथे पाकिस्तानमधून चालवल्या जाणाऱ्या ४८० पेक्षा जास्त हँडल्सद्वारे आंदोलनाशी संबंधित बनावट आणि भडकावू कंटेंट पसरवला जात होता.
त्यावेळी अनेक बनावट व्हिडिओ फिरत असल्याची धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, पाकिस्तानी अकाउंटवरून खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. अनेक पोस्टमध्ये दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात होती.
पाकिस्तानमधून चालवल्या जाणाऱ्या काही सोशल मीडिया खात्यांद्वारे बनावट कंटेंट पसरवला जात होता. दिल्ली पोलीस, संबंधित तपास यंत्रणांच्या सहकार्याने, अशी आणखी खाती शोधण्यासाठी सातत्याने काम करत आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आंदोलनांशी संबंधित एआय-निर्मित सामग्री, डीपफेक व्हिडिओ, इडिटेड फोटो आणि इतर खोटी सामग्री पसरवल्याबद्दल आतापर्यंत 400 हून अधिक हँडल्स ओळखून ब्लॉक करण्यात आले आहेत.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान, अशी काही हँडल्स सक्रियपणे खोटी माहिती पसरवत असल्याचेही आढळून आले होते. या सोशल मीडिया खात्यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिकृत निवेदने एडिट करून आणि दृकश्राव्य सामग्रीमध्ये फेरफार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
सोशल मीडियावर माहिती वेगाने पसरते, परंतु प्रत्येक पोस्ट, व्हिडिओ किंवा फोटो अचूक असेलच असे नाही. कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा ती पुढे शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.












