उत्कृष्ट सामाजिक आणि धार्मिक सेवेबद्दल सर्व सेवेकऱ्यांचा गौरव
मसुरे | झुंजार पेडणेकर : बिळवस जलमंदिर येथील श्री सातेरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात रविवारी संपन्न झाला. या जत्रोत्सवामध्ये भाविकांना मार्गदर्शन आणि देवालय ट्रस्टला गर्दी नियंत्रण साठी सहकार्य व्हावे म्हणून
श्री श्री १०८ महंत मठाधीश परम पूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज संस्थापित श्री स्वामी समर्थ मठ मसदे येथील सेवेकऱ्यांनी सामाजिक व धार्मिक बांधिलकी जपत स्वयंसेवक म्हणून अत्यंत मोलाची सेवा दिली. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री सातेरी देवालय ट्रस्ट यांच्या वतीने मठाच्या सर्व सेवेकऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
जत्रोत्सव कार्यक्रमात मठातील सेवेकऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध रीतीने, निष्ठेने आणि तत्परतेने सेवा बजावली. त्यांच्या या निस्वार्थी योगदानामुळे सर्व कार्यक्रम व उपक्रम अत्यंत उत्साहात आणि सुरळीतपणे पार पडण्यास मदत झाली. सेवेकऱ्यांच्या या सामाजिक जाणीवेचे आणि समर्पण वृत्तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या सेवाकार्यात तुकाराम माळकर, साईप्रसाद पेडणेकर, संतोष हिवाळेकर, संतोष निर्गुण, राज चव्हाण, निखिल परब, कोमल पेडणेकर, आदिती मेस्त्री, प्रांजल बिलये, स्मिता गावडे, स्वाती तांबे, राजश्री जाधव, भाग्यश्री खोत, अन्नपूर्णा माळकर, रचना आचरेकर, चंद्रसुहास घाडी, शिला निर्गुण, कल्पना मठकर, नारायण पोयेरेकर, अनिल पोयेरेकर, रसिका हिवाळेकर, अश्विनी पोयेरेकर, निकीता पोयेरेकर, सिद्धेश खोत आणि सुगंधा वेरलकर आदी सेवेकऱ्यांनी सक्रीय सहभाग घेऊन आपली सेवा रुजू केली.
श्री सातेरी देवालय ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सेवेकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानून भविष्यातही असेच सहकार्य आणि सेवेचे बळ लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली.













