दारूसाठी पैसे दिलें नाही म्हणून वेंगुर्ले येथे वृद्ध महिलेवर लोखंडी रॉडने खुनी हल्ला

फरार ‘पबजी’ आरोपी आठ तासात जाळ्यात : वेंगुर्ले पोलीसांची दमदार कामगिरी

वेंगुर्ले : दाजी नाईक 

दारू पिण्यासाठी पैसे मागितले पण पैसे दिले नाही म्हणून मनात राग धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने वेंगुर्ले कॅम्प येथे एका वृद्ध महिलेवर मूळ चिपळूण येथील आणि सध्या वेंगुर्ले कॅम्प येथे राहणारा हरेश निकम उर्फ ‘पबजी’ याने लोखंडी रॉडने खुनी हल्ला केला. या आल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर हल्ला करून फरार झालेला पबजी या आरोपी ला वेंगुर्ले पोलिसांनी आठ तासात शिताफीने पकडून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून वेंगुर्ले पोलीस अधिक तपास करत आहेत.

वेंगुर्ले कॅम्प येथील निलेश राठोड याने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आमच्या कॅम्प येथील राहत्या झोपडीमध्ये माझी आई रात्री झाडू मारत होती. यावेळी तेथे पबजी आला. त्याने माझ्या आईकडे दारूसाठी पैसे मागितले ते दिले नाही या रागाने त्याने आई ला शिवीगाळ करून थांब तुझा जीवच घेतो असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने डोकीवर चेहऱ्यावर व छातीवर जोरात मारून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात आईला पडलेली पाहून तो तेथून पळून गेला. या तक्रारीवरून पोलिसांनी पबजी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

रात्रीपासून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. आणि अवघ्या आठ तासात त्याला शेतातून पकडून आणले. सदर कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भीमसेन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्री राठोड, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, पोलीस हवालदार मळगावकर, मनोज परुळेकर, जयेश सरमळकर यांचा सहभाग होता.

पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन गुन्ह्याचा उलगडा केलेला आहे. आरोपी काल रात्री दहा वाजता हल्ला करून फरार झालेला होता. याप्रकरणी अधिक तपास पो.उ.नि. शेखर दाभोलकर करीत आहेत.