दोडामार्गमध्ये ‘विभाजन विभिषिका स्मृतिदिन’ उत्साहात; फाळणीच्या वेदनादायी आठवणींना दिला उजाळा

​दोडामार्ग : सुहास देसाई

देशाच्या फाळणीदरम्यान झालेल्या भीषण हिंसाचारात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आणि विस्थापित झालेल्या लाखो नागरिकांच्या त्यागाला अभिवादन करण्यासाठी दोडामार्ग येथे ‘विभाजन विभिषिका स्मृतिदिन’ अत्यंत गांभीर्याने आणि उत्साहात पार पडला. १४ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतिहासातील या कटू प्रसंगाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

​राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश या ​कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना वक्त्यांनी सांगितले की, फाळणीचा काळ हा भारताच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी अध्याय आहे. या कटू इतिहासाची जाणीव ठेवूनच देशात राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ करणे ही आजच्या काळाची गरज आहे.
​
​या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये प्रमुख वक्ते शरद गवस, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद सदस्य तथा तिरंगा यात्रेचे प्रमुख संदीप गावडे, जिल्हा परिषद सदस्य सौ. धरणे महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, तसेच जि. प. सदस्य दीपक गवस यांची प्रमुख उपस्थिती होती.

​याशिवाय नगराध्यक्ष चेतन चव्हाण, पंचायत समिती सदस्य सोनिया नाईक, संजय सातार्डेकर, महिला आघाडीच्या दीक्षा महालकर, आकांशा शेटकर, शहर प्रमुख राजेश फुलारी, सुनील गवस, अंकुश नाईक, संध्या प्रसादी, पराशर सावंत, देवेंद्र शेटकर दिलखुश देसाई आणि भैया पांगाम यांसह अनेक स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पिंपळेस्वर हॉल मध्ये ​चित्रप्रदर्शनातून इतिहास व ​कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे फाळणीच्या काळातील विविध ऐतिहासिक घटना, विस्थापितांचे हाल आणि त्यावेळची परिस्थिती दर्शवणारे चित्रफलक फोटो प्रदर्शन लावण्यात आले होते. हे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आणि उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
​कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’च्या गगनभेदी घोषणांनी करण्यात आली.