भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश चितळे यांचे निधन

चिपळूण (वार्ताहर) : चिपळुणातील भारतीय जनता पक्षाचे जुने व ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश आत्माराम चितळे यांचे मंगळवार दि. २८ जुलै रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने भाजपसह सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
स्व. रमेश चितळे यांनी अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या शांत, संयमी व कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याच्या स्वभावामुळे त्यांना पक्षात मानाचे स्थान होते. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ७ वाजता त्यांच्या राहात्या घरापासून निघून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात कुटुंबियांसह मित्रपरिवार आणि असंख्य हितचिंतक असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.