रत्नागिरी ः प्रतिनिधी
वडिलांना शिवीगाळ करत असल्याच्या रागातून प्रौढाच्या डोक्यात दगड मारुन दुखापत केली. ही घटना बुधवार 29 जुलै रोजी दुपारी 2.15 वा.सुमारास पोमेंडी बुद्रुक येथे घडली.
सागर सुरेश पवार (32,रा.पोमेंडी बुद्रुक,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात किशोर लुकाजी पवार (47,रा.पोमेंडी बुद्रुक बौध्दवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी दुपारी फिर्यादी हे रत्नागिरीत येण्यासाठी बसस्टॉपवर चालत जात होते. त्यावेळी त्यांना वाडीतील विनोद पवार हे भेटले. ते दोघेही बोलत असताना संशयित सागर पवार हा रस्त्याने गुरे घेउन आला व वळणावर पुढे जाउन परत मागे आला. व त्याने फिर्यादीला तू माझ्या बापाला शिवीगाळ का करतोस असे बोलून हातातील दगड फिर्यादीच्या डोक्यावर डाव्या बाजूस फेकून मारला. त्यामुळे फिर्यादी खाली पडल्यावर संशयिताने पुन्हा त्यांना दगडाने मारुन दुखापत केली. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.












