BREAKING NEWS: आंजनारी पूल येथे भीषण अपघात; हातखंबा पोलीस वाहतूक शाखेच्या गाडीला कंटेनरची धडक

गाडी अंजनारी नदीत खोल उतारावर पलटी, तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

लांजा : संतोष कोत्रे

मुंबई गोवा महामार्गावर अंजनारी पूल येथे भीषण अपघात

हातखंबा पोलीस वाहतूक शाखेच्या गाडीला कंटेनरची धडक

गाडी अंजनारी नदीत खोल उतारावर पलटी, तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी , कंटेनर चालक गंभीर

रात्री अकरा वाजवण्याची घटना

हातखंबा टॅप शासकीय वाहन क्रमांक MH08 BE 3561यास लोखंडी सळई घेऊन जाणारा कंटेनर RJ 09 GE 2397 यांने मागून ठोकर दिल्याने सदरचे शासकीय वाहन हे नदीत खोल उतारावर उलटी

होऊन जाऊन त्यातील दोन पोलिस अंमलदार 1. शिंगाडे 2. सहाय्यक फौजदार संतोष गायकवाड हे जबर जखमी झालेले आहेत

त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे पाठवण्यात आलेले आहे,

तसेच कंटेनर रस्त्याच्या शेजारी पलटी होऊन त्यातील चालक हा गंभीर जखमी झालेला आहे.