वेंगुर्ले : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी वायंगणी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याअंतर्गत सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय, वायंगणी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदात्यांना भेटवस्तू म्हणून टी-शर्ट देण्यात येणार असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
याच दिवशी वायंगणी गावातील नवीन मतदार नोंदणी अभियान देखील राबविण्यात येणार आहे. पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवून लोकशाही बळकट करण्यासाठी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मनीष दळवी मित्रमंडळ, वायंगणी यांच्या वतीने करण्यात आले असून, सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान व मतदार जनजागृतीसारख्या उपक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.













