गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ग्राऊंडवरील घटना
रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ग्राऊंडवर झाडाच्या तोडलेल्या फांद्या उचलताना सर्पदंश झाल्याने नगरपरिषदेच्या सफाई कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना 31 जुलै रोजी सकाळी 9.30 वा. सुमारास घडली.
काशिनाथ लक्ष्मण गोताड (50,रा.फगरवठार, रत्नागिरी ) असे सर्पदंश होऊन मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ते गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ग्राऊंडवर झाडाच्या तोडलेल्या फ़ांद्या उचलत असताना त्या खाली असलेल्या सापाने त्यांना दंश केला. ही बाब इतर कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी काशिनाथला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.











