कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे यांची ठाणे येथे बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले असून, लवकरच ते नवीन ठिकाणी पदभार स्वीकारणार आहेत. कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना शेडगे यांनी विविध गुन्ह्यांच्या तपासात तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या कारवाया यशस्वीपणे पार पडल्या होत्या.












